नागपूरमध्ये 9 डॉक्टरांना केले क्वारंटाई
नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील 9 डॉक्टरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मेडिकल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अर्धांगवायूच्या रुग्णाने कोरोना पॉझिटिव्ह भावाविषयीची माहिती लपवून ठेवले होते. नागपूरच्या शासकीय रुग्णालयात अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. या रुग्णाचा भाऊ कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. मात्र या रुग्णाने ही माहिती लपवून ठेवल्याने त्याच्यावर सर्वसाधारण रुग्णाप्रमाणे उपचार करण्यात आले.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतल्यावर त्याच्या भावावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं लक्षात आलं. त्याची ‘कोरोना’ चाचणी केली असता हा रुग्ण आणि त्याची पत्नीही कोरोना पॉझिटीव्ह निघाले. आता रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिचारिका, डॉक्टर आणि इतर व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.