सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 18 एप्रिल 2020 (21:30 IST)

कोरोनावर लस शोधली, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचा दावा

कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लशीचे 10 लाख डोस उपलब्ध होतील. गिल्बर्ट म्हणाले, “आमची टीम अशा आजारावर संशोधन करत होती जो आजार महामारीचं रुप धारण करु शकतो. या कोरोना लसला एक्स (X) असं नाव देण्यात आलं आहे. ही औषधाचं 12 वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. औषधाचा रोग प्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. याची वैद्यकीय चाचणी देखील सुरु झाली आहे.”
 
विशेष म्हणजे या लसबाबत ऑक्सफोर्ड टीमला इतका विश्वास आहे की वैद्यकीय अहवाल येण्याआधीच त्यांनी याचं उत्पादन देखील सुरु केलं आहे. प्रोफेसर हिल म्हणाले, “या लस उत्पादनात 7 उत्पादकांना सहभागी करण्यात आलं आहे. यात 3 ब्रिटन, 2 यूरोप, 1 चीन आणि एक भारतातील उत्पादक आहे असे स्पष्ट केलं.