शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मार्च 2020 (10:00 IST)

कौतुकास्पद, पार्लेने पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार

पार्ले कंपनी लोकांसाठी धावून आली आहे. पार्लेने पुढच्या 3 आठवड्यात 3 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्त्यांवर राहणारे किंवा हातावरती पोट असणारे नागरिक यांच्यापर्यंत अन्न पोहचावं या उद्देशाने पार्ले कंपनीने ही घोषणा केली. पार्ले कंपनी प्रत्येकी एक आठवड्यात 1 कोटी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. देशात पुढचे 3 आठवडे लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनपर्यंत पार्ले कंपनी गरिबांसाठी बिस्किट पुड्यांची वाटप करणार आहे. 

देशावर कोरोना आजाराचं मोठं संकट आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. देशातील नागरिक या लॉकडाऊनला सकारात्मक प्रतिसादही देत आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांही परिस्थितीचं गांभीर्य जाणून मदतीचा हात पुढे करत आहेत.