शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (21:01 IST)

ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार, मुंबई आणि पुण्यात आढळले आणखी 7 रुग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉन या नवीन व्हेरियंट कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात या  व्हेरियंटची लागण झालेले आणखी 7 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील ओमिक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 17 झाली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे की मुंबईत ओमिक्रॉनचे 3 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेतील 4 रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकन व्हेरियंट आढळून आला आहे. बाधितांमध्ये एका 3 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. यानंतर, देशातील नवीन  व्हेरियंटसह एकूण संक्रमितांची संख्या 32 वर गेली आहे.
यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्यात यापूर्वी संसर्ग झालेल्या 7 जणांपैकी 5 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर इतर दोघांची प्रकृती स्थिर आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, "जिल्ह्यातील 7 पैकी 5 ओमिक्रॉन बाधितांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे." पवार यांनी शुक्रवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेतला.