रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:35 IST)

दिवसभरात १५ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात शुक्रवारी दिवसभरात १५ हजार ५९१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे, तर दिवसभरात १३ हजार २९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख १७ हजार ७२० झाली आहे.
 
राज्यात शुक्रवारी  ४२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या मृत्युदर २.६५ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१ टक्के आहे. नोंदविण्यात आलेल्या ४२४ मृतांमध्ये २७२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ८७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.