गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (07:36 IST)

राज्यात 62 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 688 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 77,17,362 इतकी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 98.08 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या 3,709 सक्रिय रुग्ण आहेत.