शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 2 मे 2021 (18:38 IST)

रेमडेसिवीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा-अमोल कोल्हे

Restrict the hospitals that prescribe Remedesivir-Amol Kolhe
काही रुग्णालये रुग्णांना रेमडेसिवीर लिहून देतात. यामुळे रुग्णांचे नातेवाईकांना इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागते. असे करण्याला रुग्णालयांना मज्जाव करावा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमधील उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचे ऑडिट करावे, तसे झाल्यास ऑक्सिजनचा योग्य वापर होऊन बचत होऊ शकेल असेही त्यांनी सरकारला सूचवले आहे.