शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (21:54 IST)

सेरो सर्वेत ८६ टक्के मुंबईकरांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

सेरो सर्वेत ८६ टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. पण तरीही मुंबईकरांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
 
मुंबईत पाचव्यांदा सेरो सर्वे करण्यात आला. यावेळी ८६ टक्के मुंबईकरांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटीबॉडीज आढळल्या विशेष म्हणजे लस घेतलेल्या ९० टक्के मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या. तर लस न घेतलेल्या ८० टक्के लोकांमध्येही अँटीबॉडीज आढळल्या आहेत. २४ वार्डात हा सर्वे्ह करण्यात आला होता. यात महिला व पुरुषांमध्ये समानच अँटीबॉडीज आढळल्या आहेत.