रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (08:07 IST)

शहरात 155 नवीन रुग्णांची नोंद, 101 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 155 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 101 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 415 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 72 हजार 8 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
 
सध्या 1 हजार 59 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 516 रुग्ण गृहविलगीकरणात असून 543 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
 
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 59 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 425 आहेत. आज दिवसभरात 18 हजार 661 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 16 लाख 80 हजार 246 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.