गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (16:40 IST)

आता नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवायही आधार कार्ड डाउनलोड करू शकता, जाणून घ्या कसे

अनेकवेळा असे घडते की आपला आधार कार्डचा क्रमांक एकतर बंद होतो किंवा नंबर आधारशी नोंदणीकृत नसतो.पण आता आपण त्याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
 
भारतात आधार कार्ड किती महत्वाचे आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. परंतु आधार कार्डमध्ये कोणतेही अपडेट करण्यासाठी, नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड फक्त नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येतो. अशा परिस्थितीत, अडचण येते जेव्हा मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जात नाही आणि आपल्याला आपल्या आधारमध्ये काही अपडेट करावे लागतात.आज आम्ही सांगत आहोत की आपण आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर न देता आधार कार्ड कसे डाउनलोड करू शकता.
 
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाशिवाय आधार कार्ड डाउनलोड करा
 
* मोबाईल नंबर न नोंदवल्याशिवाय आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
 
* आता वरच्या डाव्या बाजूला My Aadhaar Card च्या पर्यायावर क्लिक करा.
 
* आता Get Aadhaar विभागात जाऊन Order Aadhaar PVC Card  वर क्लिक करा.
 
* हे केल्यानंतर, 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
 
* आता My Mobile Number is not Registered च्या  समोरच्या बॉक्सवर क्लिक करा 
 
* येथे आपल्याला दुसरा किंवा Unregistered  मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय मिळेल.
 
* आता OTP वर क्लिक करा आणि प्राप्त झालेला OTP एंटर करा.
 
* हे केल्यानंतर एक नवीन इंटरफेस उघडेल, जिथे आपल्याला पेमेंट करावे लागेल.
 
* आता पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी सबमिट करावी लागेल.
 
* हे केल्यानंतर, आपल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सर्विस रिक्वेस्ट क्रमांक दिला जाईल. याद्वारे आपण आपल्या आधार कार्डची स्थिती जाणून घेऊ शकाल.
 
* अशा प्रकारे आपण नोंदणीकृत मोबाईल नंबरशिवाय आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकाल.