गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:20 IST)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार ही धरणे भरली 100 टक्के भरली

The four dams that supply water to Pune city are 100 percent full Maharashtra News Pune News In Marathi Webdunia Marathi
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चार ही धरणे भरली 100 टक्के भरली आहेत. खडकवासल्यासह पानशेत, वरसगाव, टेमघर फुल्ल झाले आहे.त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.चार ही धरणात मिळून 99.94 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
 
खडकवासला धरणातून पाच हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सुरु झाला आहे. पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता ही यामुळे मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे धरण भरले आहे.
 
खडकवासला धरण ९७ टक्के भरल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढू शकतो. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.