1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (09:55 IST)

दुर्देवी ! पुण्यात चिमुकल्यासह आईने आत्महत्या केली

Unfortunate! The mother committed suicide with Chimukalya in Pune Maharashtra News Pune News
पुण्याच्या म्हातोबाची आळंदी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे.येथे एका आईने आपल्या 2 वर्षाच्या लहान बाळाला घेऊन विहिरीत उडी घेऊन आपले आयुष्य संपविले आहे.पुण्यातील पुणे-सोलापूर मार्गाजवळ असलेल्या म्हातोबाची आळंदी येथे  हा प्रकार घडला आहे. मयत महिलेचे वय वर्ष 30 आहे.त्यांचा मुलगा 2 वर्षांचा होता.त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे असे केल्याचे समजले आहे.मूळ कारण अद्याप कळाले नाही .पोलीस तपास करत आहे.काही लोकांनी सांगितले की या दोघांचे प्रेत विहिरीच्या पाण्यात तरंगत असल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.या दोघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.