लीगमध्ये शाहरुख संघ विकत घेणार

shahrukh khan
मुंबई| Last Modified शुक्रवार, 8 मे 2020 (15:58 IST)
एका लीगमध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान एक संघ विकत घेण्याचे वृत्त आले होते. आयपीएलमध्ये शाहरुखच्या मालकीचा कोलकाता नाइट रायडर्स हा संघ आहे. आता केकेआरने एका लीगमध्ये संघ विकत घेण्याबाबत एक वक्तव्य केले आहे.
शाहरुखच्या मालकीचे सध्या दोन संघ आहेत. आयपीएलमध्ये केकेआर आणि कॅरिबियन लीगमध्ये त्रिनिदाद हे दोन्ही संघ त्याच्या मालकीचे आहेत. आता इंग्लंडमधील हंड्रेड नावाची लीग सुरु होणार आहे. या लीगमध्येही शाहरुख संघ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात तीन संघांची मालकी असलेला शाहरुख हा एकमेव मालक असू शकतो. कारण आतापर्यंत कोणत्याही मालकाने क्रिकेट विश्वात तीन संघ विकत घेतलेले नाहीत. त्यामुळे आता या लीगमधील शाहरुख कोणता संघ विकत घेणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

इंग्लंडमध्ये ही लीग या वर्षापासून सुरु होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे ही लीग आता पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कोरोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेट लीगमध्ये यजमान देशांतील मालकांनीच संघ विकत घ्यावा, असे ठरवले होते. पण त्यांनी हा नियम आता शिथिल केला आहे. त्यामुळे शाहरुख या लीगमधील संघ आता विकत घेऊ शकतो.
केकेआर संघाचे सर्व व्यवहार वेंकी मैसूर हे पाहत असतात. आता वेंकी यांनी केकेआर इंग्लंडच्या लीगमधील संघ विकत घेणार का याबाबत एक वक्तव्य
केले आहे. याबाबत वेंकी म्हणाले की, केकेआर इंग्लंडच्या लीगमधील संघ विकत घेणार, असे वृत्त आले होते. पण जर या लीगसाठी जर कोणी आम्हाला संपर्क केला तर आम्ही संघ विकत घेण्याबाबत विचार करू शकतो.

केकेआरमध्ये शाहरुखची सहमालकी आहे. केकेआरच्या मालकांमध्ये शाहरुखबरोबर जुही चावला आणि जय मेहता यांचा सहभाग आहे. केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी गौतम गंभीर हा संघाचा कर्णधार होता. पण गेल्या हंगामात केकेआरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकवर गदा येऊ शकते, असे चाहते म्हणत आहेत.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...