शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (22:39 IST)

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह

जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत . ओमिक्रॉनने भारतातही चिंता वाढवली आहे. दरम्यान, उच्च जोखीम असलेल्या देशांतील सुमारे 30 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण चार राज्यांमध्ये या 30 प्रवाशांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या प्रवाशांचे स्वॅब नमुने पुढील चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाने मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत. या तपासणीत या प्रवाशांपैकी कुणालाही कोरोना या ओमिक्रॉनच्या नवीन प्रकाराची लागण झाली आहे की नाही हे उघड होईल
अधिका-यांनी सांगितले की यातील बहुतेक प्रवासी उच्च जोखमीच्या आफ्रिकन देशांतून परतले आहेत. यापैकी 9 प्रवासी हे राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत. याशिवाय तामिळनाडूतील 2 आणि गुजरातमधील 1 प्रवाशांचा समावेश आहे. या राज्यांच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी अधिक रुग्ण लक्षणे नसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये कोविडची फारच कमी लक्षणे आढळून आली आहेत. या सर्व प्रवाशांच्या संपर्क ट्रॅकिंगचे काम सुरू झाले आहे.
कर्नाटकातील बेंगळुरू शहरात गुरुवारी ओमिक्रॉन प्रकाराचे पहिले प्रकरण आढळून आले. यापैकी एक प्रवासी 27 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून दुबईला गेला होता आणि त्याने या संदर्भात स्थानिक प्राधिकरणाला माहितीही दिली नव्हती. या प्रकाराची लागण झालेली दुसरी व्यक्ती डॉक्टर आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या संपर्क ट्रॅकिंगवर काम केले जात आहे.