धक्कादायक !महाराष्ट्रात कोरोनामुळे 4005 आणि केरळमध्ये 79 मृत्यू
देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी, राज्यांकडून दैनंदिन अहवाल येण्यास बराच विलंब होत आहे. बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र आणि केरळमध्ये चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे आरोग्य मंत्रालयाने गेल्या एका दिवसात 4100 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.
मंत्रालयानुसार, महाराष्ट्राने 4005 लोकांच्या मृत्यूची माहिती दिली. या लोकांचा मृत्यू बऱ्याच काळापूर्वी झाला होता, मात्र राज्य सरकारकडून ही माहिती उशिरा आली. त्याचप्रमाणे केरळने गेल्या एका दिवसात 79 मृत्यूचा हिशोब दिला आहे. गेल्या एका वर्षात केरळने आतापर्यंत 20 हजारांहून अधिक लोकांच्या मृत्यूची माहिती केंद्राकडे पाठवली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरू असून केरळमध्ये आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हळूहळू राज्यांमधून आकडेवारी समोर येत आहे, ज्याचे एक कारण म्हणजे संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांना दिलेली भरपाई. मात्र, केंद्र सरकारने पुन्हा राज्यांना वेळेवर माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंत्रालयाच्या अहवालानुसार , देशातील 8 राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यांतील दैनंदिन दर पाच टक्क्यांहून अधिक आहे. त्यापैकी राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, मिझोराम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या जिल्ह्यांमध्ये संसर्गाबाबत अजूनही सतर्कतेची गरज आहे. केंद्राने या राज्यांना संबंधित जिल्ह्यांमध्ये कोविड दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या.