शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (19:09 IST)

धक्कादायक बातमी !कोरोनाच्या भीतीमुळे विषप्राशन करून कुटुंबाने आत्महत्या केली

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला आहे,परंतु कोरोना अद्याप संपलेला  नाही.त्यामुळे कोरोनाच्या संकटाचे सावट अजूनही आहे,मास्क लावून,सामाजिक अंतर राखून आणि हात वारंवार साबणाने धुवून आपण याच्या दुष्प्रभावाला कमी करू शकतो.या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर उच्छाद मांडला होता.बरेच लोक मृत्युमुखी झाले.किती तरी मुलं अनाथ झाली.या साथीच्या रोगाचा सर्वानाच फटका बसलेला आहे.आर्थिक मानसिक शारीरिक सर्व दृष्टीने या रोगाचा माणसांवर परिणाम झाला आहे.अशा एका मानसिक अवस्थेतून निघताना आंध्रप्रदेशातील कर्नुल शहरात आज सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना घडली आहे.
 
 
आंध्रप्रदेशातील कर्नुल शहराच्या वड्डेनगरी भागात एका कुटुंबातील चोघांनी विष प्राशन करून आपल्या जीवाला संपवण्याची दुर्देवी घटना घडली आहे.प्रताप वय वर्षे 42 ,हेमलता वय वर्षे 36,जयंत वय वर्षे 17 आणि रिशीता वय वर्षे 14 असे या मयतांची नावे आहेत.कुटुंब प्रमुख प्रताप हा टीव्ही मॅकेनिक असून जयंत हा कोणता तरी कोर्स करत होता तर रिशीता ही मुलगी इयत्ता सातवीत असल्याचे सांगितले जात आहे.या मृतकांच्या जवळ सोसाइड नोट सापडली आहे.त्यात आत्महत्येचे कारण कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या करत आहे असे लिहिले आहे.आमच्या काही नातेवाईक आणि मित्रांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आणि आम्हाला कोरोनाची भीती बसली आहे.त्यामुळे त्यांनी हे पाउल उचलून आपले जीव संपविले.असे सांगितले जात आहे.
 
 
या घटने बाबत सांगताना शेजाऱ्यांनी सांगितले की दररोज प्रमाणे सकाळी कोणीच घराबाहेर पडले नाही आणि घराचे दार देखील उघडले नाही त्यामुळे आम्ही दार ठोठावले परंतु काहीच प्रतिसाद मिळाला नाही.आम्ही घाबरून पोलिसांना बोलावले त्यांनी दार तोडल्यावर पोलिसांना चौघांचे मृतदेह आढळले.या घटने ची सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.