शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (19:13 IST)

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना झाला

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण लागल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. माझ्या संपर्कात आलेल्यांची देखील काळजी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी हे देखील आवाहन केले आहे. 
 
माझी कोरोनाचाचणी चा अहवाल पॉजिटीव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या आणि चाचणी करून घ्यावी असे ही त्यांनी सांगितले आहे. 
 
मला कोरोनाचे सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे मी कोरोनाची चाचणी केली आणि या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे असे ही त्यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. आणि मास्क चा वापर करावा असे ही आवाहन त्यांनी केले आहे.