सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 27 एप्रिल 2020 (07:19 IST)

माथी भडकावणार्यांरपासून दूर राहा : भागवत

कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे देश सध्या संकटात सापडला आहे. या काळात आपल्या सर्वांना एकांतात राहून देशसेवा करायची आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पपडू नका. सध्या संकटाचा काळ आहे, त्यामुळे माथी भडकावणार्यांधपासून   दूर राहा. 
 
आपापल्याला समाजाला दिशा देण्याचे काम प्रत्येकाने नागरिक म्हणून करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ते नागपुरात बोलत होते.
 
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात पुन्हा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सध्या एकूण 40 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास लॉकडाउन वाढण्याची शक्यता आहे. लॉकडाउन असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काही लोक नियमांचे पालन करताना दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी निवेदन सादर केले.
 
यावेळी एकांतात बसणे हीच राष्ट्रसेवा असल्याने त्यांनी म्हटले आहे. सरकार आणि प्रशासनाचे सूचनांचे पालन करुन त्यांना सहकार्य करणे आवश्क आहे. लॉकडाउन उठवल्यानंतर समाजाने उतावळे होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.
 
घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते भय, क्रोधापासून दूर राहणे, आवश्यक असल्याचे भागवत यांनी सांगितले. कारण, घाबरल्याने शत्रूचे मनोबल वाढते. तर, क्रोधाने तुमचे स्वास्थ्य बिघडेल. त्यामुळे माथी भडकावणार्यांपासून दूर राहण्याचा सल्ला भागवत यांनी दिला आहे. प्रत्येक समाजाच्या समजूतदार लोकांनी पुढे येऊन आपापल्या समाजाला दिशा देण्याचे काम करायला हवे. या काळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम  करुन गर्दी करू नये. संघाचे सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. या संकटाकाळात जे सेवा करत आहेत त्यांनी ही सेवा निस्वार्थ भावाने करायला हवी. उपकाराच्या भावनेने कधी सेवाभाव होत नाही.