सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: जळगाव , रविवार, 26 एप्रिल 2020 (16:30 IST)

भुसावळमध्ये एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

भुसावळ शहरातील एमआयडीसीत आज सकाळी साडेअकरा वाजता इलेक्ट्रिकल वस्तूंची निर्मिती करणाऱ्या डिस्को इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या आगीत संपूर्ण कंपनी आणि 2 आयशर ट्रक जळून खाक झाल्या.

या एमआयडीसीत ए- 12 प्लॉटमध्ये डिस्को इंटरप्राईजेस नावाची टिव्ही, फायबर, कुलर आदी वस्तूंची निर्मिती करणारी इलेक्ट्रिकल कंपनी आहे. या कंपनीत सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आणि कंपनीच्या आजूबाजूला गवत असल्यामुळे आग अधिक भडकली. या कंपनीच्या कंपाऊंडमध्ये 2 आयशर ट्रक पार्किंग केले होते, ते देखील आगीत भस्मसात झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भुसावळ नगरपालिकेचे 2 व दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा 1 अशा 3 अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले होते. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली.