रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 16 मे 2020 (09:32 IST)

दिल्लीत अडकलेले महाराष्ट्रतील विद्यार्थी परतणार

उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिल्लीत गेलेले महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी तिथे टाळेबंदीमुळे अडकून पडलेल आहेत. त्यांना राज्यात परत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून शनिवारी ते राजधानी दिल्लीतून निघणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. दिल्लीहून शनिवार संध्याकाळी ४ वाजता रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये (रविवार) दिवशी संध्याकाळी ४ वाजता पोहचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली आहे.