गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (10:08 IST)

फेब्रुवारी 2021 पर्यंत संपुष्टात येणार कोरोना

भारतात कोरोना संक्रमणाने आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने केला आहे. समितीने केलेल्या दाव्यानुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना संक्रमण संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
 
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10.6 दशलक्ष अर्थात एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा कासही या समितीने बांधला आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतात सध्या एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 75 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. व्हायरसपासून बचावासाठी करण्यात येणारे उपाय यापुढे सुरूच ठेवायला हवेत, असा सल्लाही समितीने दिला आहे.
 
कोरोना स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून या समितीने गठण करण्यात आले होते. आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर ए. विद्यासागर हे या समितीचे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, भारताने मार्च महिन्यात लॉकडाउन घोषित केला नसता तर देशभरात 25 लाखांहून अधिकमृत्यू झाले असते. 
 
अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात एव्हाना 1.14 लाख कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.