मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (16:39 IST)

कोरोना नंतर आता या नवीन आजाराचं संकट

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर पडू शकलेले नाही. कोरोना विषाणूच्या समोर येणारे नवीन व्हेरियंट ही देशांची चिंता वाढवत आहेत. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, त्याच दरम्यान जगात आणखी एक नवीन आजाराचा धोका ऐकू येत आहे, ब्रिटनमध्ये लासा तापाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील लासा तापाने त्रस्त असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचा 11 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.लंडनमधील एका रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाला. आरोग्य अधिकार्‍यांच्या मते, 2009 पासून देशात या आजाराची पहिली तीन प्रकरणे आढळून आली आहेत. संक्रमित तिन्ही लोक उत्तर इंग्लंडमधील एकाच कुटुंबातील होते आणि अलीकडेच पश्चिम आफ्रिकेत गेले होते.
 
या तापाचे नाव नायजेरियातील लासा नावाच्या ठिकाणावरून पडले आहे, जिथे या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला होता. लासा ताप, एक तीव्र विषाणूजन्य रक्तस्रावी रोग, इबोला आणि मारबर्ग विषाणूंसारखाच आहे, परंतु तो खूपच कमी प्राणघातक आहे. या आजाराशी संबंधित मृत्यूदर सुमारे एक टक्के आहे . परंतु काही लोकांसाठी, जसे की गर्भवती महिलांसाठी ते अधिक धोकादायक असू शकते. नायजेरियातील दोन परिचारिकांच्या मृत्यूनंतर हा गंभीर आजार समोर आला होता.