मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : सोमवार, 21 मार्च 2022 (09:46 IST)

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के

मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. रविवारी  २७ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकाही कोरोना रूग्णांचा मृत्यू झालेला नाहीये. बरे झालेल्या रूग्णांचा दर हा ९८ टक्के इतका आहे. मुंबईतील एकूण बरे झालेल्या रूग्णांचा दर १०३७६८६ इतका आहे. त्याचप्रमाणे मुंबईत एकूण २९८ इतके सक्रिय रूग्ण आहेत.
 
मुंबईतील एसिम्प्टोमॅटीक रूग्णांची संख्या २६ आहे. तर रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांची संख्या १ आहे. ऑक्सिजन बेडवरील रूग्णांची संख्या १ इतकी आहे. त्याचप्रमाणे मुंबईत २४ तासांमध्ये १६ हजार ५३३ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. परंतु आतापर्यंत एकूण चाचण्यांचा अहवाल पाहिला असता १६४,९२,४७० इतका आहे.
 
१३ मार्च २०२१ ते १९ मार्च २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. तर मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा दर १८८२१ दिवस इतका आहे. ऑक्सिजन बेडची संख्या ५ हजार ९२३ इतकी आहे. सलग दोन दिवस रुग्णसंख्या ३० हून कमी आढळून आली आहे.
 
राज्यात ११३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांत राज्यात २८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२३,२८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे.