बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:48 IST)

हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळला

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका आहे. कारण  हॉगकाँगमध्ये दुसऱ्यांदा कोरोना झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. याबाबत हॉगकाँग विद्यापीठानं हा दावा केला आहे. 
 
हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं की, “हॉगकाँगमधील एका व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये कोरोना झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर हे समोर आलं,” असं संशोधकांनी म्हटलं आहे.
 
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत नसल्याचा दावा वारंवार केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. तज्ज्ञांनी असं म्हटलं होतं की, कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते.