मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑगस्ट 2020 (08:36 IST)

हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम, ठरावही मंजूर

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व निवड करण्याची मागणी केली होती. त्यानंतर  काँग्रेस कार्यसमितीची बैठक झाली. या बैठकीत सुरूवातीलाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पद सोडण्यास तयार असल्याचं सांगत जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती कार्यसमितीकडे केली.
 
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना दिलेल्या पत्राच्या वेळेवरून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत नेत्यांना सुनावलं. त्याचबरोबर हे पत्र भाजपला पूरक असल्याचा आरोपही बैठकीत झाला. काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पुढील सहा महिन्यात नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तोपर्यंत हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी कायम राहतील असा ठरावही मंजूर करण्यात आला.