सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मे 2020 (09:12 IST)

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५० हजारांकडे, राज्यातल्या रुग्णसंख्या साडे पंधरा हजारांवर

जगभरात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३६ लाखाहून जास्त झाली असून, अडीच लाखाहून जास्त बळी या आजाराने  घेतले आहेत. सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला असून तिथे या आजाराने ७० हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंड मधे २९ हजार ४२७, इटलीमधे २९ हजार ३१५, स्पेनमधे २५ हजार ६१३ तर  फ्रान्समधे २५हजार ५३१ जण या आजाराने मरण पावले आहेत.
 
देशात काल दिवसभरात २ हजार ९५८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे देशात एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ३९१ इतकी झाली आहे. काल रात्रीपासून देशभरात १११ जणांचा या आजारानं मृत्यू झाला. त्यातले सर्वात जास्त गुजरातमधे ४९ इतके नोंदले गेले. देशात आतापर्यंत कोविड-१९ मुळे एक हजार ६९४ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजार १६० म्हणजे २८ पूर्णांक ७२ शतांश टक्के रुग्ण बरे झाले आहेत. तर ३३ हजार ५१४ जणांवर उपचार चालू आहेत.