शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 मे 2020 (15:59 IST)

देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूचा शिरकाव

देशावर कोरोनाचे संकट असताना आता पुन्हा एक नवे संकट देशावर येऊन धडकले आहे. देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात आफ्रिकी स्वाईन फ्लू आल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या फ्लूचा डुक्करांना फटका बसत असून या ‘आफ्रिकी स्वाईन फ्लू’मुळे आसाममध्ये २ हजार ५०० हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
राज्यातील ३०७ गावांमध्ये या आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला असून या गावातील एकूण २ हजार ५०० हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आसाम सरकारने दिली आहे. या फ्लूचा कोरोना व्हायरसशी संपर्क नाही. तसेच हा आफ्रिकी स्वाईन फ्लू असल्याचे राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था, भोपाळ यांनी स्पष्ट केले आहे.