पालघर प्रकरण : सुमीत राघवन संतापला, म्हणाला "नराधमांची भूमी"

summet raghvan
Last Modified सोमवार, 20 एप्रिल 2020 (13:20 IST)
पालघर प्रकरणावर संताप व्यक्त करत अभिनेता सुमीत राघवनने ‘संतांची, वीरांची भूमी.. असं आपण यापुढे बोलायचं टाळूया. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे’, असं ट्विट केले आहे.

उल्लेखनीय आहे की गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात लोकांनी दोन साधूंसह तीन जणांना ठार मारल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

यावर संताप व्यक्त करत सुमीतने ट्विट करत लिहिलं, ‘मी सुन्न झालोय. भीषण, भीतीदायक, लाजिरवाणं आहे जे घडलं. संतांची वीरांची भूमी असं टाळूया आपण यापुढे बोलायचं. नराधमांची भूमी जास्त योग्य आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेवर लागलेला काळा डाग आहे.’ सुमीतने या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पालघर पोलिसांना टॅग केलं आहे.
दुसरं ट्विट करत त्याने लिहिलं, ‘जमाव इतका रक्तपिपासू कसा असू शकतो? हा मूर्ख प्रकार कोणीच कसा थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. खरचं ही वेळ आहे स्वत:ला प्रश्न विचारण्याची की हे योग्य आहे का?

पालघर प्रकरणाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतल्याचं म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता

टाळेबंदीत शूटिंग करणारा अक्षय कुमार ठरला पहिला अभिनेता
कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काहीशी ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ...

भाई मैं ठेके से घर तक तो पहुँचा सकता हूँ, सोनू सूदचे हे ट्विट व्हायरल
अभिनेता सोनू सुद सध्या चर्चेत आहे कारण त्याने परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने ...

सेफ अली खान करीना कपूरसाठी बनला शेफ, ईदच्या निमित्ताने बनविलेले मटण बिर्याणी तर करिश्माने असे केले कौतुक
देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. लॉकडाऊनमुळे मुस्लिम समाज यावेळी आपल्या घरातच ईद साजरे ...

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा

शाहरुख खानवर दोन मराठी लेखकांनी केला स्क्रिप्ट चोरीचा
शाहरुख खानच्या रेड चिलीज एण्टरटेनमेन्ट कंपनीने 'बेताल' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला. पण ...