रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांनी कमी केला
कोरोनामुळे संपुर्ण विश्वात आर्थिक मंदीचे सावट आहे. मात्र तरिही भारतातील अर्थव्यवस्था पॉझिटिव्ह राहिल, असा अंदाज आहे. कोरोनाच्या संसर्गाचा अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणांमावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, त्याच परिस्थितीचा अभ्यास करुन निर्णय घेत आहोत, असेही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट ४ टक्क्यांनी कमी करुन ३.७५ टक्क्यांवर आणला आहे. तर रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तसेच नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असल्याचे दास यांनी सांगितले. यापैकी नाबार्डला २५, सीआयडीबीआयला १५ तर एनएचबीला १० हजार कोटींची मदत दिली जाणार आहे. कोरोनाचे संकट हे मानवतेची परिक्षा आहे. आमचे ध्येय हे मानवतेला वाचविण्याचे असले पाहीजे आणि आरबीआय या उद्देशाला धरूनच काम करेल. पुढेही करत राहिल.