रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (23:51 IST)

राज्यात आज 6,436 कोरोना रुग्णांची नोंद, तर 18,423 जणांना डिस्चार्ज मिळाला

राज्यात दिवसभरात 6,436 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून  18,423 कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. 
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78,10,136 झाली आहे. त्यापैकी 75,57,034 जण बरे झाले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.76 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात सक्रिय कोरोनारुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या राज्यात 1 लाख 06 हजार 059 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.राज्यात आज 24 रुग्णांचा मृत्यू झाला. आता पर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 098 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्याची कोरोना मृत्युदर 1.83 टक्के आहे. सध्या राज्यात 23,830 कोरोना रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहे तर 6,73,875 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता पर्यंत राज्यात 7 कोटी 56 लाख 55 हजार 012 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.