1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (09:19 IST)

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाखांच्या पुढे

The total number of corona patients
देशभरासह राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग हळूहळू कमी होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात राज्यात ३ हजार २७७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७ लाख २३ हजार १३५ झाली आहे.सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ८२ हजार ९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २३ हजार १३५ (१८.१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० जण गृह विलगीकरणात आहेत. तर ७ हजार ५८६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.