बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 (08:10 IST)

राज्यात अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा कमी घसरणार

मुंबईसह राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा खाली खाली घसरण्याचे संकेत प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईमार्फत देण्यात आले आहे. येत्या ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानाचा पारा कमी घसरेल. तर काही ठिकाणी एक आकड्यापर्यंत तापमानाचा पारा खाली घसरेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट केले आहे. मुख्यत्वेकरून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात थंडीचा पारा खाली घसरण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 
 
येत्या काही दिवसांमध्ये वातावरण हे २० डिग्री सेल्सिअसच्या खाली असेल, यासाठी वाऱ्याचा वेग हे मुख्य कारण असेल. पण थंडीचे आगमन हे डिसेंबरमध्येच अधिकृतपणे होईल असे हवामान विभागाचे संकेत आहेत. मुंबईत हवेतला गारवा वाढतानाच हवेची गुणवत्ताही सुधारल्याचे चित्र समोर आले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत नोव्हेंबरमध्ये वाढ झाली आहे.