1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (21:17 IST)

कोरोनाच्या म्यूटेन्टशी लढण्यात सक्षम आहे वॅक्सीन!अभ्यासात उघडकीस आले

नवी दिल्ली .दिल्लीतील खासगी रुग्णालयांनी केलेल्या एका सर्वेक्षणात कोविड-19 विरोधक लस कोरोनाच्या म्यूटेन्ट च्या गंभीर स्वरूपांशी लढण्यात सक्षम आहे.या लस पासून लोकांना गंभीर संक्रमण होणे,हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूपासून संरक्षण मिळते.
काही लोकांना आंशिक किंवा पूर्ण लसीकरणा नंतर देखील संसर्ग होण्याच्या बातम्या आल्या आहेत. 
अशी काही प्रकरणेही समोर आली आहेत जेव्हा संपूर्ण लसीकरणानंतर देखील लोकांचा मृत्यू झाला. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसच्या परिवर्तित म्युटंट वर लसीच्या दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त करण्यासाठी हा अभ्यास केला गेला.
यावर्षी, लसीकरण मोहिमेच्या पहिल्या100 दिवसात कोव्हीशील्ड लसीकरणा नंतर देखील रुग्णालयात संसर्गग्रस्त आढळलेले  69 आरोग्य कर्मचारी (लक्षण असलेले)वर अभ्यास करण्यात आला. 
अपोलो हॉस्पिटलचे ग्रुप मेडिकल डायरेक्टर डॉ अनुपम सिब्बल यांनी सांगितले की 69 लोकांपैकी 51जणांनी संसर्ग होण्यापूर्वी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि उर्वरित 18 जणांनी प्रथम डोस घेतला होता.
 
ते म्हणाले की, संसर्ग मुख्यत: विषाणूच्या बी1.617.1 स्वरूपा ने  
 (47.83 टक्के)आणि बी 1 आणि बी 1.1.7 असलेल्या स्वरूपामुळे झाले.सिब्बल म्हणाले ,या गटात किरकोळ लक्षणे असणाऱ्या दोन लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु कोणाला ही आयसीयू मध्ये दाखल केले नाही.आणि कोणीही मरण पावले नाही.
 
हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे कारण अर्ध्याहून अधिक लोकांना या विषाणूच्या (व्हीओसी) चिंताजनक स्वरुपाचा संसर्ग झाला होता आणि तरीही ते या गंभीर आजाराने वाचले आहे,लसीकरण न केल्यास त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकले असते.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे ज्येष्ठ चिकित्सक आणि संशोधनात समाविष्ट असलेले डॉ. राजू वैश्य म्हणाले की लसीकरणानंतर कोरोनाव्हायरसचे संसर्ग काही आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आढळले.
या अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे की आरोग्य कर्मचारी लसीमुळे त्या परिस्थिती पासून वाचले ज्या मध्ये गंभीर आजार होतो आणि रुग्णालयात दाखल करण्याची आणि आयसीयू मध्ये भरती करण्याची आवश्यकता असते आणि या गंभीर आजारामुळे रुग्ण दगावू पण शकतो. रुग्णालयाकडून जारी केलेला हा दुसरा अभ्यास आहे.