बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (17:48 IST)

जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली

जगभरात कोरोनाविरुद्धचे युद्ध अजूनही सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील बहुतांश देशांमध्ये अजूनही लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे. याबाबत माहिती देताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सीनच्या पुरवठ्यावर संघटनेने बंदी घातली आहे. Covaxin ची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही लस प्रभावी असून सुरक्षिततेची चिंता नाही. असे म्हटले आहे. 
 
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सींमार्फत भारत बायोटेकद्वारे निर्मित कोविड-19 लस कोवॅक्सिनचा पुरवठा निलंबित केला आहे. जेणेकरून उत्पादक कंपनी सुविधांमध्ये सुधारणा करू शकेल आणि तपासणीमध्ये आढळून आलेले काही दोष दूर करू शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने लस मिळविणाऱ्या देशांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, परंतु काय कारवाई केली जाईल हे सांगण्यात आलेले नाही. WHO ने म्हटले आहे की ही लस प्रभावी आहे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही चिंता नाही, परंतु निलंबनामुळे कोवॅक्सीनचा पुरवठा खंडित होईल.
 
वृत्तानुसार, हैदराबादस्थित कंपनी भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले आहे की कोवॅक्सिन लसीची प्रभावीता आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नाही. लसीची प्रभावीता आणि सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नसल्याने कोवॅक्सीन घेतलेल्या लोकांना दिलेली लस प्रमाणपत्रे अद्याप वैध आहेत.