शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (23:21 IST)

शनिवारी राज्यात 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण

महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे राज्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे दिसतेय. दरम्यान शनिवारी  राज्यात 130 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 937 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर  2 रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आजपर्यंत 77,25, 553 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झालेय. राज्यात आजपर्यंत 7, 94, 53, 522 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहे.
 
यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 290 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 145 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतेय. मुंबईत गेल्या 24 तासात 49 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत  एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत 33 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. निदान झालेल्या 49 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्ण ऑक्सिज बेडवर उपचार घेत आहे. तर एक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे.