रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 13 एप्रिल 2020 (07:50 IST)

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1982

महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
तसेच महाराष्ट्रात कालपर्यंत 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांच्या कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत, तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आणि 5064 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
 
चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात करोनामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे मात्र काळजी घ्या बाहेर पडू नका असं आवाहन सतत करण्यात येत आहे.
 
स्वयंशिस्त पाळा, गरज असेल तरच बाहेर पडा, लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन करा, मास्क लावूनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच तुम्ही खबरादारी घ्या आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.