1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (09:10 IST)

राज्यात सायबर विभागाकडून १६१ गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 161 गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे
 
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर याकरिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे.
 
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण 161 गुन्हे 9 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत.
 
राज्यातील दाखल गुन्हे
 
राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बीड 22, कोल्हापूर 13, पुणे ग्रामीण 12, मुंबई 11, जळगाव 10, जालना 9, नाशिक ग्रामीण 8, सातारा 7, नांदेड - 6, नागपूर शहर 5, नाशिक शहर 5, परभणी 5 ठाणे शहर 4, बुलढाणा 4, गोंदिया 3, भंडारा 3, अमरावती 3, लातूर 3, नंदुरबार 2, नवीमुंबई 2, उस्मानाबाद 2, हिंगोली 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे.