आदिवासी बांधवानी कोरोना लसीकरण करावे यासाठी गावोगावी बैठका

Last Modified शुक्रवार, 21 मे 2021 (21:30 IST)
कोरोना या साथरोगापासून स्वतःचा व कुटुंबातील सदस्यांचा बचाव करण्यासाठी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता कळवण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी
कोरोना लसीकरणचा लाभ घ्यावा असे आवाहन कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदिवासी बांधवाना
केले आहे .
कळवण तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्टयात लसीकरण संदर्भात आदिवासी बांधवामध्ये अफवा पसरवून गैरसमज केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी आदिवासी भागात कमी प्रमाणात लसीकरण होत असल्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी ए कापसे यांना आदिवासी भागातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार बी ए कापसे होते.

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे . परिस्थिती मध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हाच उत्तम पर्याय असल्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे अशी विनंती सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आयोजित बैठकीत नागरिकांशी संवाद साधतांना केली. कळवण तालुक्यातील मोहमुख, बिलवाडी, सुकापूर, वडपाडा, पळसदर, मोहपाडा, देवळीकराड,लिंगामा, आमदर या गावांना भेटी देऊन नागरिकांसमवेत
बैठका कोरोना लसीकरणाचे महत्व पटवून दिले.

कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतर कोणताही गंभीर त्रास होत नाही.लसीकरण झाल्यानंतर यदा कदाचित कोरोनाची लागण झाली तर त्यापासून फार धोका संभावत नसल्याने नागरिकांनी मनात कोणताही किंतू परंतु न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार बी ए कापसे यांनी
यावेळी केले . श्री मीना व श्री कापसे यांनी आदिवासी नागरिकांना विश्वासात घेऊन संवाद साधत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या मनातील शंका, कुशंकाना पूर्णविराम दिला.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रकरण वाढले, बीसीसीआय भारतीय ...

इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रकरण वाढले, बीसीसीआय भारतीय संघाच्या सुट्या रद्द करू शकतो
न्यूझीलंडला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद हरवल्यानंतर भारतीय संघासाठी आणखी एक ...

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, भाजप प्रदेश कार्यकारिणीत ...

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा, भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव मंजूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा असा भाजप प्रदेश कार्यकारिणीत ठराव ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, ...

Strawberry Moon 2021 आज आकाशात अद्भुत दृश्य दिसेल, स्ट्रॉबेरी मून उदयास येईल
आज संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र उदयास येईल, पण दृश्य भिन्न असेल. या दृष्टीस स्ट्रॉबेरी ...

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार

12वी चा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर होणार
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य मंडळांना दहावीच्या आत बारावीच्या परीक्षेचे अंतरिम ...

‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही ...

‘डेक्कन क्वीन’नंतर पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसलाही हिरवा कंदील
मुंबई : राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-नाशिक ...