शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (22:08 IST)

राज्यातल्या २२ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक

Weekly positivity rate is highest in 22 districts of the state
राज्यातल्या २२ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका आहे. त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिकमध्ये २० ते २६ जानेवारी या काळात एकूण १,७६,५८७ नवीन रुग्ण सापडले आहेत.
 
अशी आहे उच्च पॉझिटिव्हिटी रेटची यादी
 
विदर्भ हॉटलिस्टवर : नागपुर (४४.५९), अमरावती (२४.९३), गडचिरोली (३९.१८), वर्धा (३८.११), अकोला (३५.३१), गोंदिया (२४.०५), वाशिम (३३.९४), चंद्रपूर (३१.१८), भंडारा (२६.००), यवतमाळ (२५.६७)
 
मराठवाडा : नांदेड (३४.४६), औरंगाबाद (३३.३४), लातूर (२८.९४), सोलापूर (२७.४१), उस्मानाबाद (२४.०२)
 
पश्चिम महाराष्ट्र : पुणे (४२.४९), कोल्हापूर (२४.६१), सांगली (३१.८९), सातारा (२९. ३१)
 
उत्तर महाराष्ट : नाशिक (४०. ९४), नंदुरबार (२९.८५)
 
कोकण : सिंधुदुर्ग (२६. ९८)