रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (08:41 IST)

काय सांगता ! रुग्णाच्या नाकांतून व्हाईट फंगस मेंदूत शिरला

एमआरआयमध्ये पांढऱ्या बुरशीच्या गुठळ्या दिसल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे बुरशी काढून टाकण्यात आली.
कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत हैदराबादमध्ये,एक दुर्मिळ व्हाईट फंगस,ज्याला वैज्ञानिक भाषेत एस्परगिलस असेही म्हणतात,एका रुग्णाच्या मेंदूत सापडला या व्यक्तीने मे मध्ये कोरोनाला हरवले होते. रुग्णाच्या नाकातून बुरशी मेंदूपर्यंत पोहोचली होती.
 
हैदराबादच्या एका रुग्णालयाचे तज्ज्ञ सांगतात की मे महिन्यात रुग्ण कोरोनामधून बरा झाला. काही वेळानंतर त्याला बोलण्यास त्रास होऊ लागला.जेव्हा एमआरआय केले गेले तेव्हा त्यात गुठळ्या दिसल्या. नंतर असे आढळून आले की मेंदूमध्ये एक दुर्मिळ पांढरी बुरशी आहे जी मेंदूत जमा झाली आहे. शस्त्रक्रियेद्वारे बुरशी काढून टाकण्यात आली आहे.
 
रुग्ण मधुमेही नव्हता
तज्ज्ञ सांगतात की बुरशीजन्य संसर्गाची अधिक प्रकरणे मधुमेह ग्रस्त रुग्णांमध्ये आढळतात. हे प्रकरण देखील दुर्मिळ आहे कारण रुग्णाला मधुमेह नव्हता.डॉक्टरांनी सांगितले की मेंदूच्या आत लहान तुकडे सापडले आहेत, या मध्ये ऑपरेशन दरम्यान कोणताही बदल दिसला नाही. त्याचप्रमाणे मेंदूच्या एका भागामध्ये कुजलेला पदार्थ सापडला आहे जो मेंदूपासून पूर्णपणे वेगळा होता.