गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 5 जुलै 2021 (11:08 IST)

चिंताजनक बातमी !कोरोनातून बरे झाल्यावर आता बोन डेथचा धोका

Worrying news! Bone death threat now after recovering from Corona
सध्या सर्वत्र कोरोनाविषाणूने उच्छाद मांडला आहे.कोरोनाच्या नवीन नवीन व्हेरियंटमुळे दररोज काही न काही नवीन समस्या उद्भवत आहे.कोरोनाने संक्रमित झालेले रुग्ण नवीन आजाराशी झुंज देत आहेत.
 
मुंबईत ब्लॅक फंगस नंतर कोरोनाहून बरे झालेल्या लोकांमध्ये एक नवीन समस्या उद्भवत आहे.आता देशाची आर्थिक राजधानी मध्ये एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे बोन डेथचे तीन प्रकरण समोर आले आहे.या मुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. 

या एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे बोन डेथच्या आजारात हाड गळण्यास सुरुवात होते.असं म्हणून होत कारण रक्त हाडांच्या ऊतकांमध्ये योग्य प्रकारे पोहोचत नाही.डॉक्टरांना भीती आहे की काही दिवसांत ही प्रकरणे आणखी वाढू शकतात. 
 
ब्लॅक फंगस आणि एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होण्याची मुख्य कारण स्टिरॉइड्स आहे.कोरोनाच्या रुग्णांना बरे करण्यासाठी स्टिरॉइड्स द्यावे लागते.
 
मुंबईत एका रुग्णालयात 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या तीन रुग्णांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसवर उपचार करण्यात आले. कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर या रुग्णांना एव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा त्रास झाला.डॉक्टर सांगतात की याना फीमर बोन म्हणजे मांडीच्या हाडात वेदना होत होती.हे तिन्ही रुग्ण डॉक्टर असल्यामुळे त्यांना लक्षण ओळखता आले आणि ते ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी गेले.त्यांच्या मध्ये हा आजार कोरोनाव्हायरसच्या उपचाराच्या 2 महिन्यांनंतर आढळला आहे.
 
ब्लॅक फंगस आणि एव्हॅस्क्युलरर नेक्रोसिस आजाराचे मुख्य कारण स्टिरॉइड्स असल्याचे सांगितले जात आहे. कोव्हीड च्या रुग्णांना बरे करण्यासाठी बऱ्याच प्रकरणांमध्ये स्टिरॉइड्सचा वापर केला जात आहे.