शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (17:37 IST)

चिंताजनक बातमी! कोरोना रुग्णांमध्ये रेक्टल ब्लीडिंगचा धोका

Worrying news! Risk of rectal bleeding in corona patients marathi news coronavirus news in marathi webdunia marathi
भारतात प्रथमच कॅव्हिडच्या रुग्णांमध्ये रेक्टल ब्लीडिंग होण्याचे प्रकरण समोर आले आहे.हे रेक्टल ब्लीडींग सायटोमेगॅल विषाणूंशी संबंधित आहे.
 
ब्लॅक फंगस नंतर आता कोव्हीडच्या रुग्णांमध्ये जीवघेणा रेक्टल ब्लीडिंग होण्याचा धोका वाढला आहे.गेल्या काही दिवसांत राजधानी दिल्लीच्या दोन रुग्णालयांत अशा प्रकारच्या पाचपेक्षा जास्त घटना समोर आल्या आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णांना गंगाराम रुग्णालयात कोरोनाचे निदान झाल्यानंतर 20-30 दिवसानंतर रेक्टल ब्लीडिंग होण्याची तक्रार सुरु झाली.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आजपर्यंत रेक्टल ब्लीडिंग कमी प्रतिकारक शक्ती असलेले  कर्करोगाचे रुग्ण,एड्सचा रुग्णात आढळून यायची. भारतात प्रथमच कोविडच्या रुग्णांमध्ये रेक्टल ब्लीडिंग होण्याच्या घटना घडल्या आहेत.रेक्टल ब्लीडिंग हे सायटोमेगॅल विषाणूशी संबंधित आहे.  
 
रेक्टल ब्लीडिंग मध्ये,या रूग्णांना पोटात दुखणे, शौचाच्या वेळेस रक्त स्त्राव होण्या  यासारख्या समस्या उद्भवतात. कोविड संसर्ग आणि उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्स यामागील कारण असू शकतात.असे रुग्णालयाचे मत आहे.
 
गंगाराम इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड पॅनक्रिएटिकोबिलरी सायन्सचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल अरोडा म्हणाले की सायटोमेगॅल विषाणूशी संबंधित असे संक्रमण भारतीय लोकसंख्येत  80-90 टक्के आधीच अस्तित्वात असतात, परंतु आपली  रोग प्रतिकारशक्ती मजबूत असते, त्यामुळे त्याची लक्षणे लक्षणे दिसत नाहीत. परंतु ज्यांची प्रतिकारशक्ती एखाद्या कारणामुळे कमकुवत होते.त्यांच्या मध्ये अशी लक्षणे दिसू लागतात.  
 
 
गंगाराममध्ये पाचपैकी एका पेशंटचा मृत्यू झाला
 
गंगाराम रुग्णालयात दाखल झालेल्या पाच रूग्णांची वय 30 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे.हे सर्व दिल्ली-एनसीआरचे आहेत.त्यापैकी दोघांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत होते.या दोघांपैकी एकाचे जीव वाचविण्यासाठी मोठी शस्त्र क्रिया करावी लागली आहे.तर दुसऱ्याने आपला जीव गमावला.उर्वरित तिघांवर अँटिव्हायरल थेरेपी द्वारे यशस्वीरित्या उपचार केले गेले.
 
 
अनेकांना काढ्यामुळे त्रास झाला-
 
मुलचंद रुग्णालयात रेक्टल ब्लीडिंगचे प्रकरण आले होते.55 वर्षीय त्या व्यक्तीने सांगितले की गेल्या तीन महिन्यापासून तो दिवसातून 4-5 वेळा काढा घेत आहे.मार्चपासून आतापर्यंत अशी आणखी बरीच प्रकरणे रूग्णालयात आली आहेत, ज्यांना मूळव्याधीचा त्रास झाला.या लोकांनी व्हाट्सअप ग्रुपमध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे घरगुती औषध जास्त प्रमाणात घेतले होते.