मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: मँचेस्टर , मंगळवार, 18 जून 2019 (11:03 IST)

तगड्या इंग्लंडचा आज कमकुवत अफगाणिस्तानशी सामना

इंग्लंड येथे खेळल जात असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 24 वा साखळी सामना आज (मंगळवारी) येथील मैदानावर तगड्या इंग्लंडबरोबर कमकुवत अफगाणिस्तानशी होणार आहे.
 
या विश्वचषकामध्ये इंग्लंडला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, सध्या हा संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन तसेच शतकवीर जेसन रॉय हे दुखापतग्रस्त असल्याने ते आजच्या सामन्यात खेळणबाबत साशंकता आहे. 
 
सध्या इंग्लंड गुणतक्त्यात चौथ्या स्थानी आहे. त्यांनी आतापर्यंत 4 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. तर एका सामन्यात पराभव पत्करला आहे. त्यांचे एकूण गुण 6 झाले आहेत. तर प्रतिस्पर्धी संघ असलेला अफगणिस्तानचा संघ गुणतक्त्यात एकदम तळाशी आहे. त्यांचे आतार्पंत एकूण 4 सामने झाले असून त्या चारही सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. 
 
मंगळवारच्या सामन्यात ते विजयी चमत्कार करतील, असे वाटत नाही. एकूणच इंग्लंडला आजच्या सामन्यात विजयासाठी फारसे कष्ट घ्यावे लागतील, असे सध्यातरी दिसत नाही.