शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

ICC World Cup 2019 : उद्यापासून क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात

आईसीसी वर्ल्ड कप 2019 चा शानदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून इंग्लंडच्या वेल्स येथील हा सोहळा पार पडणार. या स्पर्धेत जगभरातील 10 क्रिकेट संघ सहभागी होत आहे.
 
30 मे पासून क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळवला जाणार आहे. 
 
ओपनिंग सेरेमनीमध्ये 4 हजाराहून अधिक चाहते उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच इंग्लंडमधील शाही घराणे आणि महाराणी सुद्धा वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीला उपस्थिती लावणार आहे. 
 
भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता हा उद्घाटन सोहळा सुरु होणार आणि याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर बघता येईल. 
 
वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिका सोबत खेळवला जाणार आहे.