शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Updated :जोहान्सबर्ग , सोमवार, 20 मे 2019 (12:30 IST)

संघासाठी विश्‍वचषक मिळवणार – डेल स्टेन

क्रिकेट मधुन निवृत्त होण्यापुर्वी मला माझ्या संघासाठी विश्‍वचषक जिंकुण द्यायचा आहे असे विधान दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने एका कार्यक्रमा प्रसंगी दिले आहे.
 
आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने खेळलेल्त्या जवळपास सर्वच विश्‍वचषकात धदाक्‍यात सुरूवात केली. मात्र, बाद फेरीत त्यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागल्याने त्यांच्यावर चोकर्सचा शिका बसला. मात्र, स्टेनने क्रिकेटपमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्या संघाला विश्‍वचषकाची ट्रॉफी मिळवून द्यायची आहे, आणि संघावरील चोकर्सचा शिक्‍का पुसायचा आहे असा निर्धार व्यक्त केला.
 
यावेळी बोलताना स्टेन म्हणाला की, विश्‍वचषक स्पर्धेत खेळताना मी माझे सर्वस्व पणाला लावून खेळेन. माझ्या घरात अनेक महत्वाच्या ट्रॉफी आहेत, पण विश्‍वचषक विजेतेपदाची ट्रॉफी नाही. त्यामुळे मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याआधी मला माझ्यात संघाला विश्‍वविजेता करायचे आहे. आमच्या संघात चांगले फलंदाज आहेत. 3 ते 4 अष्टपैलू खेळाडू आहेत. तुम्ही संघ पाहिलात तर तुम्हाला एक बाब नक्की लक्षात येईल की हे खेळाडू सर्वोत्तम नसले तरी प्रतिभावान आहेत. विश्वचषक स्पर्धेचे वातावरणच खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देईल. त्यामुळे विश्वचषकातील आफ्रिकेचा भूतकाळ विसरुन खेळाडू खेळले तर त्याचा नक्कीच स्पर्धेत फायदा होईल, असेही स्टेनने सांगितले.