शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑक्टोबर 2023 (14:09 IST)

IND vs PAK : विराट कोहलीने बाबर आझमची मागणी पूर्ण केली,सामन्यानंतर दिली खास भेट

kohli babar
IND vs PAK :  भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यांची नेहमीच एकमेकांशी तुलना केली जाते. पाकिस्तानी चाहते बाबरचे गुणगान गातात तर भारतीय चाहते कोहलीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणतात.
 
विश्वचषक 2023 मध्ये भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर किंग कोहली आणि बाबर आझम यांचा एक व्हिडिओ खूप ट्रेंड करत आहे.
 
विराट कोहलीने बाबर आझमला आपली स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली
भारताकडून 7 विकेटने पराभव झाल्यानंतर, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने मैदानाच्या मध्यभागी विराट कोहलीला एक खास गोष्ट विचारली , जी देण्यापासून किंग कोहली स्वतःला रोखू शकला नाही आणि बाबर आझमने त्याची इच्छा पूर्ण केली. त्याला स्वाक्षरी केलेली जर्सी दिली.
 
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये किंग कोहली बाबर आझमला त्याची जर्सी भेट देताना दिसत आहे. किंग कोहलीचा औदार्य पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.
 
भारत-पाक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय मिळवला . तर 2023 च्या विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच पराभव होता. भारतीय संघाने विश्वचषकात विक्रमी आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला.
 
भारतीय संघ आजपर्यंत एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे. टीम इंडियाने 3 सामन्यात 6 गुण मिळवले आहेत. तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.







Edited by - Priya Dixit