गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (11:05 IST)

World Cup Final: पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद सामना पाहण्यासाठी जाणार

19 नोव्हेंबरला भारतीय संघ वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना खेळणार आहे. भारतीय संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा अंतिम सामना सेमी-फायनल 2 च्या विजेत्याशी होणार आहे. फायनल मॅचबाबत चाहत्यांमध्ये आधीच जोरदार चर्चा सुरू आहे.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबाद स्टेडियमवर उपस्थित राहणार आहे. 

भारतीय संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ तीनदा अंतिम फेरीत पोहोचला होता. 1983 साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाची नोंद करण्यात अपयशी ठरला होता. पण 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले.

12 वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहे. भारतीय खेळाडू बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे.
 





Edited by - Priya Dixit