1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Indian football team leaves for Doha

भारताचा फुटबॉल संघ दोहा येथे रवाना

Indian football
कोरोनातून सावरलेला जादुई कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील 28 सदस्यीय भारतीय फुटबॉलचा संघ बुधवारी संध्याकाळी दोहाकडे रवाना झाला. या संघाला तेथे आगामी 2022 फिफा विश्वचषकाचा क्वॉलिफायर सामना व 2023 मध्ये होणार आशियाई चषकातील क्वॉलिफायर्सचे उर्वरित सामने खेळावायचे आहेत.
 
छेत्रीला कोरोनाची लागण झाल्याने तो मार्चमध्ये यूएई व ओमानविरूध्द खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण लढतीत संघाचा भाग नव्हता. मात्र, तो 3 जूनला यजमान कतारविरुध्द होणार्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतीय संघ याअगोदर दोहा येथे बायोबबलमध्ये सराव शिबिरात भाग घेणार आहे.
 
भारती फुटबॉल संघ :
डिफेंडर्स - प्रीतम कोटल, राहुल भेके, नरेंद्र गहलोत, चिंग्लेनसाना सिंह, संदेश झिंगन, आदिल खान, आकाश मिश्रा, शुभाशीष बोस. गोलकीपर- गुरप्रीत सिंह संधू, अरिंदर सिंह, धीरज सिंह. मिडफील्डर - उदंता सिंह, ब्रँडन फर्नांडिस, लिस्टन कोलाको, रॉलिन बोर्गेस, ग्लेन मार्टिंस, अनिरुद्ध थापा, प्रणॉय हलदर, सुरेश सिंह, लालेंगमाविया राल्ते, अब्दुल सहल, यासिर मोहम्मद, ललियनजुआला चांगटे, बिपिन सिंह, आशिक कुरुनियान. फॉरवड-: ईशान पंडित, सुनील छेत्री, मानवीर सिंह.
पुढील लेख
कोरोनामुळे नोटप्रेस आता ३१ मेपर्यंत बंद