Daily Horoscope

भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु

Updated: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (13:08 IST)
 
* पाणी- मनुष्याने पाण्याप्रमाणे नेहमी मधुर आणि पवित्र राहावे.
 
* मधमाशी- मधमाशी पुष्कळ कष्ट करून पोळे बनवून त्यात मध साठवते परंतू एक दिवस मधुहा अचानक येऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. याने शिक्षा मिळते की आवश्यकतेहून अधिक संचय करणे योग्य नाही.
 
* मत्स्य- लोखंडाच्या गळाला मांस पाहून जशी मासोळी भुलल्यामुळे मांस खायले जाते आणि आपल्या प्राणास मुकते त्याचप्रमाणे आम्हाला जिव्हेच्या स्वादाला अधिक महत्त्व द्यायला नको. आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहार घ्यावा.
 
* टिटवी- ज्याप्रकारे एक टिटवी चोचीत मासा धरून असते आणि ते पाहून इतर पक्षी ते मास हिसकवण्याचा प्रयत्न करतात, आणि शेवटी मासाचा तुकडा सोडल्यावरच तिला शांती मिळते. तसेच आम्हाला स्वत:कडे अधिक वस्तू संजय करून ठेवण्याचा अट्टहास करायला नको.
 
* बालक- जसे लहान मुलं चिंतामुक्त आणि प्रसन्न दिसतात तसेच आम्हाला चिंतामुक्त आणि नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा.
 
* अग्नी- परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीत स्वत:ला समायोजित करणे योग्य ठरतं.
 
* चंद्र- जसे चंद्राला अमावास्या आणि पौर्णिमा आल्यावरही अर्थात कलेत उणे-अधिकपणा असून त्याचा विकार त्याला बाधक होत नाही, तसेच आत्म्यास देहासंबंधीचे विकार बाधक होत नाहीत.
 
* कुमारिका- देवाने बघितले की एकदा एक कुमारिका धान्य कुटत होती. तेव्हा तिच्या हातात असलेल्या बांगड्यांच्या आवाजामुळे बाहेर बसलेले पाहुणे परेशान होत होते. बांगड्यांचा आवाज बंद करण्यासाठी तिच्या बांगड्या फोडून दिल्या गेल्या आणि दोन्ही हातात केवळ एक-एक बांगडी राहू दिली. नंतर कुमारिकेने आवाज केल्याविना धान्य कुटून घेतले अर्थात आम्हालाही एका बांगडीप्रमाणे एकटे आणि निरंतर वाढत राहण्याची प्रवृत्तीसह जगायला हवं.
 
* तीर तयार करणारा कारागीर- दत्त देवाने एक असा तीर बनवणारा बघितला जो आपल्या कामात एवढा मग्न होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली तरी त्याचे कामावरून लक्ष वेधीत झाले नाही. अत: आम्हाला अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करावे.
 
* साप- देवाने सापाकडून ही शिकले की संन्यासीसारखे जगावे. जसे दोन साप कधीही एकत्र फिरत नाही तसेच दोन बुद्धिमत्तांनी कधी एकत्र फिरू नये. कोणत्याही एका जागेवर न थांबता इकडे- तिकडे विचरण करत ज्ञानाचा प्रसार करावा.
 
* कोळी- कोळी तंतूने घर बनवून त्यात क्रीडा करतो आणि त्या घरास गिळून मोकळा होता, तसेच ईश्वर मायेने सृष्टीची रचना करतो आणि मनास येईल तेव्हा नाश करतो. अर्थातच जगातील घटनांना अधिक महत्त्व देऊ नये.
 
* भ्रमरकीट- भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तसेच एकनिष्ठपणे परमात्म्याचे चिंतन करणारा त्याला पावतो.
 
* भ्रमर- सूर्यविकासी कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यावरून ‘विषयासक्तीने बंधन प्राप्त होते’, हे जाणून विषयांत आसक्ती बाळगू नये.
 
* भुंगा- याकडून देवाने शिकले की जिथे सार्थक गोष्टी शिकायला मिळतील त्या तत्काल ग्रहण कराव्या, ज्याप्रकारे भुंगा वेगवेगळ्या फुलांतून पराग घेतो.
 
* अजगर- अजगराकडून हे शिकायला मिळाले की जीवनात संतोषी बनून राहावे. जे मिळेल ते सुखसमाधाने स्वीकार करणेच आपले धर्म समजावे.

सर्व पहा

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

Jyeshta Gauri Aarti in Marathi ज्येष्ठा गौरी आरती

भक्तवत्सल व प्रेमळ गणपती श्री बल्लाळेश्वर, भक्ताच्या नावावरून गणेशाचं नाव

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments