गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 28 डिसेंबर 2020 (20:15 IST)

Dattatreya Jayanti : दत्त जयंती मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान दत्तात्रेयाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाळात भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला होता. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचं स्वरूप मानलं जातं. दत्तात्रेयामध्ये गुरू आणि देवता या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना गुरूदेव दत्त म्हणूनही संबोधलं जातं. 
 
दत्तात्रेय जयंती पूजन शुभ मुहूर्त
मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी मंगळवारी, 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 07.54 मिनिटापासून सुरु होईल. पौर्णिमा तिथी समाप्ती 30 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.57 मिनिटावर असणार. संध्याकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा पार पाडला जातो.
 
पूजा विधी
या दिवशी संध्याकाळी श्रीदत्ताची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करावी.
श्रीदत्ताचे आवाहन करावे.
एक तांब्याभर पाणी जवळ ठेवावे.
उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्या अक्षदा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करा...
ऊँ अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:, श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।
पूजा करताना पिवळे फुलं, अक्षता आणि पिवळी मिठाई अर्पित करावी.
उदबत्ती आणि दिवा लावून ओवाळावे.
आत्मा आणि मनाच्या शुद्धी व ज्ञान प्राप्ती हेतू ‘ॐ श्री गुरुदेव दत्त’ और ‘श्री गुरु दत्तात्रेय नमः’ मंत्र जपावे.
 
 
दत्त उपासना लाभ-
1. भक्तांच्या सर्व इच्छा आणि धन प्राप्ती होते.
 
2. सर्वोच्च ज्ञानासह जीवनातील उद्देश्य आणि लक्ष्य पूर्ण करण्यास मदत ‍मिळते.
 
3. काळजी मिटते आणि अज्ञात भय दूर होतं.
 
4. पापी ग्रहामुळे होणारी पापांची रोकथाम
 
5. सर्व मानसिक त्रासांपासून मुक्ती आणि कौटुंबिक संकटांपासून सुटका
 
6. जीवनात उदात्त हेतू साध्य करण्यास मदत होते
 
7. सर्व कर्म बंधनातून आत्म्याला मुक्त करण्यास मदत होते
 
8. आध्यात्मिकता प्रती झुकाव विकसित होतो